Ailaaa! आप तो यहाँ सचमुच आ गए!

लग्न - एक मोठा प्रश्न

विचार करून  कसं कोणी प्रेमात पडू शकतं ?
ही गोष्ट तर सहज व्हायला हवी.
तसच, विचार करून कसं कोणी लग्न करू शकतं ?

लग्न हा एक मोठा प्रश्न का झालाय हल्ली?
ही गोष्ट पण तर तितक्याच  सहज पणे पार पडायला हवी.
माग ह्यचं  इतकं big deal का बनवतायेत सगळे?

होईल तेव्हा होईल मी म्हणते.
होणार तर आहेच ना कधीतरी.
पण सारखं सारखं विचारत नका जाऊ, please .

आहो तुमच्याहून जास्त इच्छा आहे माझी संसार मांडायची.
तुमचं झालाय ते करून म्हणून तर माझी खबर घेताय.
जरा धीर धरा, बोलविन तुम्हाला मी पण माझ्या लग्नाला.

"बरेच दिवस झाले आम्ही नाचलो नही ना, म्हणून तू लवकर लग्न कर गं आता."
आहो माग असं सांगा ना, बोलवला असता उद्याच नाशिक ढोल ला.
नाचा ना विनाकारण. मज्जा येते. 

हा मुलगा तुला कसा वाटतो ? मित्र आहे ना जवळचा?
चांगले दिस्ता एकत्र दोघे.  करून टाका ना लग्न.
अरे बाबा मित्र आहे! मित्र! मैत्री मधे जबरदस्ती असा कसा विचार करू? 

आधी तर मुलगा आपल्याच जातीचा हवा होता तुम्हाला
आता म्हणताय कोणी पण चालेल!
मग आमच्या आयुष्याच्या पहिला प्रेमाला, का नाकरला होतं?

"मुलगा सुशिक्षित, उँच, handsome  आणि successful हवा
त्याचं स्वतहाचं घर पण असायला हवं आणि खूप पगार तर हवाच.
असाच मुलगा गाठ तू मूली."

हं? हे काय दूकान आहे का? आणि तुम्ही का ठरवताये,
की मला कसा नवरा हवाय? आणि गाठ म्हणजे काय?
इतके calculative कसं वागु शकतं कुणी? आणि का?

तो पण तर माझ्याच व्हयाचा असेल आणि almost तसच शिक्षण.
माझ्याकड़े आहे का स्वतःच् घर किव्वा गाडी किव्वा भवतव्य पगार?
जरा करा ना practically विचार.

एकी कडे म्हणता मुलीला मुलाच्याच इतकं equal मानावं.
मग मुलाकडूनच का ठेवायचे इतके expectations जासतं?
आणि का घ्यावी आर्थिक responsibility फक्त त्यानीच? 

अश्या ह्या pressure मुळेच हल्ली मुले घाबरतात.
ते commitment साठी ready नसतात, कारण तुमची मागणी संपत नाहीत.
आणि मग होतात तैयार ३० व्हया नंतर, पण ते ही तुम्हाला आवडत नही.
 
"तू चष्मा नको घालत जाउस गं, आणि केस पण वाढव आता.
जरा तुझे सुंदर photos पाठव ना मला.
ते फालतू आवतारातले अजीबात नको."

मी काय रोज साड़ी नसणारे किंवा make-up करणारे सगळीकडे?
आणि मी mall मधली mannequin आहे का?
काय झालं जर थोड़ा आवतार असला तर? आहो हेच normal आहे शेवटी.

"चल त्या लग्नाला माझ्या बरोबर. साड़ी नेसुन ये, बरं का?
लोकांची कशी.… नज़र गेली पाहिजे तुझ्यावर. एखादा चांगलं स्थळ आलं तर?"
हे सांगितल्यावर तुम्हाला वाटतं मी येणार लग्नाला? हाहाहाहाहा!

बघ एक मुलाचं स्थळ आलय.
त्याला facebook वर add करून chat करा ना.
इतकं सोप्पं असतं तर झालं असतं लग्न.

वेळ द्या जरा, होईल लग्न माझं.
एक task असल्या सारखं नका treat करू ह्या सुंदर रचनेला.
ह्या phase ची मला पण मजा घेऊ द्या जरा.

No comments: